Breaking News

वेअर हाउसमधील माल चोरणारे जेरबंद

लाखोंचा माल पोलिसांनी केला हस्तगत

पनवेल : वार्ताहर

उरण व कळंबोली येथील वेअर हाउसचे शटर उचकटुन घरफोडी करुन माल घेवुन जाणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना गोधा, गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा 35,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल यांनी जप्त केला आहे. तर दुसरीकडे वेअर हाउसमधुन कपड्यांची चोरी करणार्‍या तीन आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेलकडुन जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी 41,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

धुतुम उरण येथील ऑल इंडीया वेअर हाउस येथील गोडाउनचे शटर उटकटुन सदर गोडाउन मधुन फैब्रिक रोल, ट्रॅव्हलिंग बेंग व रेडीमेड कपड्यांचे कार्टुन अज्ञात व्यक्तींनी चोरी करून घेऊन गेले होते. या बाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच कळंबोली स्टिल मार्केट येथुन एका गोडाउन मधुन चोरी करून नेल्याने कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुशंगाने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल यांचे पथकाने दोन्ही गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत याबाबत बारकाईने निरीक्षण करून दोन्ही गुन्ह्यांची तुलना करून दोन्ही गुन्हे करणारे आरोपी हे एकच असावेत हे तपासादरम्यान निधीत केले.

गुन्ह्याच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले. गुन्हे करणारे आरोपी हे गोध्रा (गुजरात) येथील असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली होती. त्या अनुशंगाने पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करून गोध्रा, अहमदाबाद, भरूच, वडोदरा, सुरत येथे सलग आठ दिवस सापळा लावला. त्यानुसार आरोपी नामे अशफाक अब्दुल्ला अब्या (वय 31, रा. गोध्रा. पंचमहाल, गुजरात), इसाक हुसेन पातलिया (वय 40, रा. गोधा, पंचमहाल, गुजरात) यांना गोधा येथुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 35,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसर्‍या घटनेत निर्यात करण्यात येणारा माल हा बोटी मध्ये लोड करण्यापूर्वी उरण परिसरातील वेअर हाउसमध्ये ठेऊन त्यानंतर तो निर्यातीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पाठविला जातो. आखाती देशांमध्ये कपड्यांचा माल एक्स्पोर्ट करणारे व्यापारी झीसन लिमीटेड, मुंबई या कंपनीचे जावेद इस्माईल खतरी यांनी रमजा ईद निमित्ताने आखाती देशामध्ये पाठविण्यात येणारा माल उरण येथील विनय यार्ड मध्ये ठेवला होता. या मालामधील काही माल आखाती देशांमध्ये पाठविल्यानंतर त्यांचे लक्षात आले की, पाठविलेल्या मालापैकी सुमारे 1.5 कोटी रुपये किमतीचा माल हा आखाती देशातील खरेदीदार यांना कमी पोहचला आहे. त्यानंतर त्यांनी मालाबाबत खात्री केली असता त्यांचे विनय यार्डमधुन त्यांचा माल चोरीस गेला असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानुसार उरण पोलीस ठाणे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल  यांचे पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन आरोपींबाबत माहिती प्राप्त केली. गुन्ह्यामध्ये वेअर हाउसचा व्यवसाय करणारे सुरेश शंकरभाई चौधरी (वय 28, रा. भानु हाईट्स, से. 19, खारघर) व रत्नाभाई सुजाभाई पटेल (वय 42, रा. सुर्यकोटी सोसा. से. 19 खारघर) यांना अटक केली. आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी विनय यार्ड येथुन चोरी केलेला कपड्यांचा माल हा संजय गणपतलालजी सुर्या (वय वर्षे, रा. इंदिरानगर बिल्डींग, गुरुनानक स्कुल समोर, सायन कोळीवाडा) यास विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालादेखील अटक करण्यात आली. आरोपींकडुन सुमारे 41,36,000 रुपये किमतीचा कपड्यांचा चोरी केलेला माल जप्त  करण्यात आला आहे.

मोटरसायकल चोरटे गजाआड

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने या चोरांचा शोध घेतांना गुन्हे शाखा कक्ष 2, पनवेल यांच्याकडून दोन आरोपीना अटक एकुण पाच गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी वाहनांचे चोरीचे प्रमाण वाढल्याने गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशिर माहिती प्रमाणे अशा प्रकारे दुचाकी वाहने चोरी करणारे दोन आरोपी नवी मुंबई वाशी येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन फैजान फुरखान शेख (वय 23, रा. बांद्रा) व  मुस्तफा अब्दुल कय्युम सैय्यद (वय 22) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडुन एकुण 3,65,000 रुपये किमतीच्या पाच मोटर स्कुटी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply