Breaking News

भाजपचा स्थापना दिन ठिकठिकाणी साजरा

अलिबाग : प्रतिनिधी

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी (दि. 6) अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचा झेंडा फडकवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे संबोधन थेट पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.  अलिबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सतिश लेले, अ‍ॅड. अंकीत बंगेरा, संतोष पाटील, जगदीश घरत, समिर राणे, सरपंच सुजित गावंड, निखिल चव्हाण, अजित भाकरे, सुनील थळे, रमेश ढबुशे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्जत :  भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कर्जत शहरात बुधवारी (दि. 6) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांच्या कर्जत शहरातील विट्ठलनगर भागातील कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बिनिता घुमरे, कर्जत तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, भाजप कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे आदीनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचे भाषण एकत्रपणे ऐकले. भाजप युवा मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयातदेखील भाजप स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

कर्जत : भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेरळ येथील जनसंपर्क कार्यालयात बुधवारी (दि. 6) भाजपचा स्थापना दिन सोहळा साजरा करण्यात आला. नेरळ भाजपच्या वतीने स्थापना दिवसानिमित्त पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त म्हसकर यांच्या नेरळ येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक चिन्ह असलेली रांगोळी काढण्यात आली होती. पक्षाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. भाजप स्थापनादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण या वेळी आले होते. ते भाषण नेेरळ कार्यालयात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ऐकले. भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसणे, नेरळ जिल्हा परिषद गटाचे  भाजप अध्यक्ष संदीप म्हसकर, अरुण नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी गरूड, प्रकाश पेमारे, माजी उपसरपंच सचिन म्हसकर, संदिप पालांडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे, राजन लोभी, माजी शहर अध्यक्ष अनिल जैन, प्रविण गायकवाड, राकेश तिवारी, विनायक मसणे, केशव तरे, अमोल चव्हाण, योगेश ठक्कर, संजय माधवानी, कमलाकर मेंगाल, धनंजय धुळे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply