Breaking News

आ. प्रशांत ठाकूर यांचा पाणी फाऊंडेशन कार्यक्रमात सहभाग

पनवेल ः प्रतिनिधी

पाणी फाऊंडेशनच्या वतीने पारनेर भागात सुरू असलेल्या अभियानात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन उपक्रमाला मदतीचा हातही दिला.

पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासते. सातत्याने या तालुक्याला दुष्काळाच्या सावटाचा इतिहास आहे. त्यामुळे पारनेरची अनेक कुटुंबे नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाली आहेत. त्यापैकी बहुतांशी कुटुंबे पनवेल परिसरात राहतात. यामुळे पारनेर आणि पनवेल तालुक्याचा तसा जवळचा संबंध आहे. मुंबईस्थित अनेक

पारनेरकर आपल्या गावातील शिवार जलयुक्त व्हावे यासाठी पाणी फाऊंडेशन अभियानात सहभागी झाले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी, वाहतूकदार, व्यापारी आपल्या मूळ गावी जाऊन श्रमदान करतात. महाराष्ट्र तसेच कामगार दिनानिमित्त पाणी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या अभियानासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पारनेर तालुक्यातील हरेश्वर येथे निमंत्रित करण्यात आले होते. या निमंत्रणाचा क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्वीकार केला आणि महाराष्ट्रदिनी पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शेट्टी, रायगड जिल्हा परिषद अमित जाधव, डॉ. संतोष जाधव, युवा नेता किशोर चौतमोल, विचुंबे ग्रामपंचायत उपसरपंच किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, विवेक होणं यांच्यासह पनवेल भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हरेश्वर येथील श्रमदानात सहभागी झाले. त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ, मुंबईस्थित पारनेरकर, जलमित्र यांनीही श्रमदान केले. दुष्काळाशी दोन हात करण्यास पेटून उठलेल्या सर्वांबरोबर श्रमदान करता आल्याचे समाधान आमदार प्रशांत ठाकूर यांना पाहिल्यानंतर दिसत होते.

गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता पनवेलच्या या पाहुण्यांनी पारनेर तालुक्यातील नांदूर पठाराला भेट दिली. त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामाची, श्रमदानाची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच पुढील वर्षी भरीव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर आणि डॉ. संतोष जाधव यांनी या सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक हातभारही लावला. मागील वर्षी या ठिकाणी राबवण्यात आलेल्या उपक्रमामुळे काय सकारात्मक बदल झाला याबाबतची माहिती घेण्यात आली. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असणार्‍या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे गेली दोन टर्म नेतृत्व करणारे व जनतेचा बुलंद आवाज असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांचे हात पाणी फाऊंडेशनच्या सत्कार्याला लागल्याने पारनेरकरांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply