Breaking News

नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती

पनवेल ः प्रतिनिधी

महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर तसेच मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान आणि ई-श्रम कार्ड वाटप तक्का गाव येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तेजस कांडपीळे, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, युवा नेते प्रतिक बहिरा, अमन अख्तर, किरण बहिरा, जितू खुटकर, प्रशांत बहिरा, तुषार बहिरा, श्रेयस बहिरा, राम सागर, संदेश घरत, प्रमोद बहिरा, भारत बहिरा, किरण बहिरा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या वेळी उपस्थितांनी नगरसेवक अजय बहिरा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. या शिबिरात 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच 70 लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले, तर 190 जणांची ई-श्रम कार्डसाठी नोंदणी झाली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply