Breaking News

पनवेलमध्ये शिवजयंतीचा उदंड उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मंगळवारी (दि. 19) पनवेलमध्ये महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या मिरवणुकीत महापौर कविता चौतमोल,  उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, शहर अध्यक्ष जयंत पगडे, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, आयुक्त गणेश देशमुख, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शिवप्रेमी सहभागी झाले होते. शहरातील अश्वारूढ पुतळ्यापासून मिरवणुकीची सुरुवात होऊन आदर्श हॉटेल, लाईन आळी, गावदेवी पाडा, लोखंडी पाडा, परदेशी आळी, महापालिका इमारत, मुसलमान नाका येथून परिक्रमा करून टपाल नाका येथील शिवपुतळ्यापाशी मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत चित्ररथ, लेझीम पथक यांनी लक्ष वेधले, तसेच ढोल-ताशा व बँड पथकेही सहभागी होती.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply