कर्जत : प्रतिनिधी
कर्जत शहरातील नानामास्तर नगरमधील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व अभिषेक करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, मुख्याधिकारी रामदास कोकरे, उद्योजक बाळू तवळे, नगरसेविका भारती पालकर, डॉ. ज्योती मेंगाळ, माजी नगरसेवक गुरुनाथ पालकर, भानुदास पालकर, संतोष थोरवे, रामदास गायकवाड, विध्वंस गुरुजी, मीनल भुईकोट, राहुल पाडे, गणेश दिघे, मंदार कडू, हेमंत भुईकोट, केदार मांडे, विशाल मोरे आदी उपस्थित होते. सायंकाळी शाहीर रुपेश कोळंबे यांनी स्वरांजली म्युझिकल ग्रुपच्या संगीत साथीने शिवचरित्रावर पोवाडे सादर केरून उपस्थितांची मने जिंकली. त्यांनतर शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक सागर मधुकर सुर्वे यांचे ’छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण ते अफजल वध’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.