Breaking News

निगुडमाळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

माणगाव : प्रतिनिधी

मुंबईतील दानशूर व्यक्तिमत्व सुरेश शंकर उपाध्ये यांच्या आर्थिक मदतीतून व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील मांजरवणे ग्रामपंचायत हद्दीतील निगुडमाळ गावात नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. मराठी अभिनेते अरुण कदम यांच्या हस्ते शनिवारी (दि.16)  या पाणी योजनेचे लाकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष रुपेश दर्गे यांनी केले. अरुण कदम, कृष्णा महाडिक यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मांजरवणे सरपंच पुष्पा साळवी, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश गोखले, मुंबईकर मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश रिकामे, गाव अध्यक्ष अनंत वरणकर, शिक्षक विनोद लाड, राजेश महाडिक, नितीन वरणकर, विकेश ठसाळ, महेंद्र दर्गे, गणू ठसाळ, प्रकाश महाडिक, रामचंद्र दर्गे, बापू दर्गे, किसान दर्गे, बाळकृष्ण महाडिक, पांडुरंग वरणकर, शंकर महाडिक आदींसह निगुडमाळ ग्रामस्थ व मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाश धुमाळ यांनी आभार मानले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply