कर्जत : बातमीदार
नेरळजवळील शेलू गावातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्वर भगत हिने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल शेलू येथील घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य संघाकडून राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील क्लासिक गटाच्या वयोगट 47 ते 52 किलो वजनी गटात राज्याचे नेतृत्व करणारी अमृता ज्ञानेश्वर भगत हिने केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा क्रमांकावर पटकाविला. नेरळ येथील मातोश्री टिपणीस महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली अमृताचा राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल शेलू येथे जाऊन सत्कार करण्यात आला.
हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा भेट देऊन अमृता भगत या उदयोन्मुख क्रीडा पटूचा सन्मान करण्यात आला. या वेळी तिचे आई-वडील, भाऊ आवर्जून हजर होते, तर शेलू ग्रामपंचायत सदस्य समीर मसणे, ज्येष्ठ ग्रामस्थ विलास डुकरे यांच्यासह नेरळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अंकुश शेळके, दामत ग्रामपंचायत सदस्य किशोर घारे, नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, मिलिंद विरले, ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत डांगरे आदी उपस्थित होते.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper