पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आणि स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 18) आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रतिसाद लाभला. या वेळी पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे कार्ड वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
शासनाचा आरोग्य विभाग, महाराष्ट्रभूषण डॉ. नानसाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इंडियन मेडिकल ओसोसिएशन, श्री सत्य साई संजिवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केर्अम खारघर यांच्या सहकार्याने झालेल्या या मेळाव्याचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत झाला.
या मेळाव्यास तालुका आरोग्य अधिकारी सुनील नकाते, गटविकास अधिकारी संजय बोझ, डॉ. गिरीश गुणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन सकपाळ, बाळासाहेब सोनावणे आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात 8 ते 22 एप्रिलपर्यंत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रकारच्या रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार विशेष तज्ञांमार्फत करण्यात आले तसेच राष्ट्रीय अरोग्य कार्यक्रमांची जनजागृती करण्यात आली.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper