Breaking News

कोमसाप तळा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)तळा शाखेचा सातवा वर्धापनदिन सोमवारी (दि. 18)  इंदापूर येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवर कविंनी आपल्या कविता सादर केल्या..

कोमसापचे तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी प्रास्ताविकात मागील सात वर्षात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. आणि कवी दत्ता हलसगीकर यांची ‘ज्यांची बाग फुलून आली‘ ही रचना सादर केली.

कवी-साहित्यिकाने नेहमी अन्यायाविरुद्ध उभे राहून आपल्या कविता व साहित्यातून न्याय्य बाजू समाजापुढे मांडली पाहिजे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार संजय माने यांनी केलेे. कोमसापच्या माणगाव शाखेचे अध्यक्ष अजित शेडगे, जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम यांनी मनोगत व्यक्त केले.

तळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, स्वप्नाली शेठ, विशाखा जोशी, धोत्रे गुरुजी, उल्का माडेकर, संदेश शिंदे, बाळकृष्ण मेहता, संदिप जामकर, शिल्पा मोहिते, परमानंद कजबजे, पत्रकार रामजी कदम, अ. वि. जंगम, अजित शेडगे, भरत जोशी, सुरेखा तांबट, माधुरी मेहता, वंदन सापळे, यशवंत मोंडे यांनी या वेळी सुप्रसिद्ध कविंच्या रचना सादर रसिकांना तृप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रणय इंगळे यांनी केले. कोमसाप तळा शाखेचे संस्थापक पुरुषोत्तम मुळे यांनी आभार मानले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply