सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीतील तळोजा मजकुर येथे भेट देऊन नाले आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली तसेच अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पावसाळ्याच्या अगोदर ही सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजे मजकुर येथे असलेल्या नाल्याला पावसाळ्यात मोठा प्रवाह असतो. त्यामुळे या नाल्याचे काम न झाल्यास नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या नाल्याची आणि तसेच रस्त्यांच्या कामाची अधिकार्यांसह पाहणी केली व त्यांना सूचना दिल्या.
या वेळी नगरसेवक हरश केणी, भाजप नेते निर्दोश केणी, दिनेश केणी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …