पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर एसटी बसस्थानकात झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पोलादपूर एसटी बसस्थानकात सडवली आदिवासीवाडीतील सुमन वसंत कोळी (वय 30) ही भंगारगोळा करून उदरनिर्वाह करणारी महिला युवराज वसंत कोळी (आठ महिने) या तिच्या बाळासह रविवारी (दि. 17) झोपली होती. अज्ञात व्यक्तीने तिचे बाळ घेऊन तो पसार झाला.
या घटनेबाबत सुमन कोळी हिने पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper