Breaking News

पनवेलच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठीआ. प्रशांत ठाकूर यांना विजयी करा

भाजप नेते वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत यांचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त

आपल्या परिसराचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले. ते खारघर येथील बूथ कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

पुन्हा आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली पनवेल तालुका मंडलतर्फे महापालिका प्रभाग 5 व 6च्या बूथ कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि. 26) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथील रामशेठ पब्लिक स्कूलमध्ये झाली. या वेळी देशमुख आणि भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची साद कार्यकर्त्यांना घातली.

महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महापालिका स्थापन झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे महापालिकेला शासनाकडून निधी कसा उपलब्ध होऊ शकला आणि त्यामुळे किती लोकोपयोगी कामे करता आली याची माहिती दिली.

या बैठकीला महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक रामजी बेरा, नीलेश बावीस्कर, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, तसेच विजय पाटील, दीपक शिंदे, लखबीर सैनी, राजेंद्र मांजरेकर, विनोद ठाकूर, अजय माळी, अमर उपाध्याय, नरेश ठाकूर, संजय  मुळीक, किर्ती नवघरे, सनी नवघरे, योगिता कडू, सुनीता मुळीक, कांचन बिर्ला यांच्यासह प्रभागातील सर्व बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागृत राहून काम करा -लोकनेते रामशेठ ठाकूर

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते विधानसभा निवडणुकीत मिळाली पाहिजेत. लोकसभेच्या वेळी मतदार सुटी असल्याने गावाला गेले होते. त्यामुळे मतदान कमी झाले. या वेळीही दिवाळी जवळ आल्याने खरेदीसाठी लोक बाहेर पडतील. तेव्हा सगळ्यांनी जागृत राहून मतदान करून घेणे आवश्यक आहे.

सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा : आमदार प्रशांत ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षांत राबविलेल्या योजनांची माहिती देऊन पुढे आणखी कोणत्या योजना केंद्र आणि राज्य सरकारला राबवायच्या आहेत याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन बूथ कार्यकर्त्यांना केले. 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply