Breaking News

कोविड काळात डॉक्टरांचे काम कौतुकास्पद -आमदार महेश बालदी

उरण येथे आरोग्य मेळावा; सुमारे 758 रुग्णांची तपासणी

उरण ः वार्ताहर

आपण समाजाला काहीतरी देन लागतो. गोरगरीब रुग्णांची सेवा करणे हे तुम्हा आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. कोविडच्या काळात सर्व डॉक्टरांचा एकमेकांसोबत समन्वय चांगला होता. त्यामुळेच सर्वांनी चांगले काम केले. त्यात मेडिकल असोशिएशन, सर्व डॉक्टर टीमने चांगले काम केले आहे. सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पुढील काळात सर्वतोपरीने मदत करीन, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी आरोग्य मेळात्यात केले.

महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालयातर्फे आरोग्य मेळाव्याचे शुक्रवारी (दि. 22) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सिडको प्रशिक्षण केंद्र बोकडवीरा येथे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार बाळाराम पाटील यांनी भूषविले. या वेळी गट विकास अधिकारी निलम गाडे, उरण पं. स. सभापती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे,  इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक गौतम देसाई, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. राजाराम भोसले, शिक्षण अधिकारी  के. बी. अंजने, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रवीण पाटील, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शाह यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या मेळाव्यात बालरोग 88, अस्थिरोग 96, स्त्रीरोग 52,  दंत 62, कान-नाक -घसा 20, नेत्रचिकित्सा 107, सर्जरी 45, त्वचा 108, फिजिशियन 94 ,आणि सर्व जनरल रुग्ण एकूण 758 रुग्णांची तपासणी केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply