Breaking News

श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या खान्देश बांधव मेळाव्याला प्रतिसाद

भविष्यात देखिल एकत्रित येण्याचा निर्धार

नवी मुंबई : प्रतिनिधी

खान्देशातील मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईत नोकरी व व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेले नागरीकाना एकत्रित करण्यासाठी श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. असे, सागत भविष्यात देखिल सर्व खान्देशातील नागरीकांना एकत्रित येण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योजक  मधुकर पाटील यांनी केले.

श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि खान्देश भवन कृती समिती यांच्या वतीने शनिवार, सीबीडी (बेलापुर) सेक्टर – येथील श्री सप्तश्रृंगी देवी मंदीर येथे खान्देश  बाधवाचे स्नेसंमेलनाचे आणि वरण बट्टी कार्यक्रमासाठी कल्याण, पनवेल, ठाणे आणि रायगड येथुन खान्देशी नागरीक आपल्या कुटुबियांसमवेत उपस्थित होते. यात, उद्योगपती, शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी , तसेच, शिक्षक, कलाकार, पत्रकार आदींचा  समावेश होता . यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज आणि माता सप्तश्रृंगी देवी याच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यातआली.  त्यानंतर उपस्थित खान्देशी बंधूंनी आपला परिचय दिला. श्री सप्तश्रृंगी देवी मंदीराची निर्मिती सोबत खान्देशी बाधवाना एकत्रित करण्यासाठी सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र रौंदळे  प्रयत्नाचे कौतुक करत भविष्यात देखिल एकत्रित येण्याचे निर्धार केला. यावेळी सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे, पत्रकार मच्छिंद्र पाटील, हर्ष भादने, चित्रपट आणि कथा लेखक महेद्र पाटील, खारघर खान्देश रहिवाशी  संघाचे अध्यक्ष मधु पाटील, राजेद्र पाटील, शिवाजी पाटील, प्रविण पाटील, सजय वाघ, राजाराम चौधरी, श्री नेरपणार, रमाकांत नागरे, रमेश चिते, रविंद्र भोई, श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र रौंदळे, विनोद येवले आणि जगतराव पाटील यांच्यासह अनेक महिला, युवक मोठ संख्येने उपस्थित. दरम्यान, भजन सध्याचे देखिल आयोजन करण्यात आले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply