पोलादपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा

लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्‍याने अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे पोलादपूर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही.

पोलादपूर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून सोसाट्याचा वारा सुटला. या वादळी वार्‍याने धुळीचे लोट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून उधळले गेले. यामुळे काही काळ  कमी वेग ठेऊन प्रखर प्रकाशझोतामध्ये वाहने चालवावी लागली. याचदरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शेलार ढाब्याच्या नवीन इमारतीची एक भिंत वादळी वार्‍याचा प्रवाह वाढल्याने कोसळली. या वेळी भिंतीतील जांभा दगड पडल्याने हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या तीन मोटारसायकलींची हानी झाली. तुर्भे बुद्रुक येथील भिकू गणपत पवार यांच्या राहत्या घराचे पत्रे वादळी वार्‍यामुळे उडाले तर तुर्भे बुद्रुक मंदिर पत्र्याचे नुकसान झाले. सवाद धारवली सप्तक्रोशी विभागातील वावे गावात घराचे पत्रे उडाल्याच्या घटनांनी अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

पोलादपूर तहसील कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यात वादळीवार्‍यामुळे घरे व इमारतींचे नुकसान झाले असले तरी कोठेही मनुष्याला इजा अथवा जिविताची हानी झाली नाही.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply