Breaking News

माथेरानमधील 30 घोडे घेतले दत्तक; जॉकी संदेश आखाडे यांची सामाजिक बांधिलकी

कर्जत : बातमीदार

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान सध्या बंद आहे. लॉकडाऊन असल्याने या ठिकाणी पर्यटक येत नाहीत त्यामुळे येथील अश्व पालकांची आर्थिक घडी विस्कटली असून घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायला कसा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, प्रसिद्ध जॉकी माथेरानचा सुपुत्र असलेले संदेश तुकाराम आखाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत माथेरानमधील 20 घोडे दत्तक घेत असून त्यांचा दोन महिन्याचा संपूर्ण खर्च उचलला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे माथेरानमधील मोलमजुरी करणारे नागरिक, गरीब घोडेवाले यांचे अतोनात हाल होत आहेत. जॉकी संदेश तुकाराम आखाडे यांनी येथील 20 घोडे दत्तक घेऊन त्या घोड्यांचा दोन महिन्यांपर्यंतचा पूर्ण खर्च उचलला आहे. यामुळे अश्व पालकांनी संदेशचे आभार मानले आहेत. संदेश यांचे वडील तुकाराम आखाडे हे कर्जत तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष असून समाजासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात आपल्या समाजबांधवाना एक हात मदतीचा म्हणून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply