Breaking News

राज्य सरकारविरोधात ऐरोलीत भाजपचे कंदील आंदोलन

नवी मुंबई ः बातमीदार

भारनियमनाविरोधात ऐरोली भाजप मंडलच्या वतीने रविवारी (दि. 25) संध्याकाळी कंदील आंदोलन करण्यात आले. भारनियमन व वाढीव सुरक्षा ठेवींचा निर्णय रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय या वेळी जाहीर करण्यात आला. महावितरणाविरोधात विद्युत पुरवठा बंद असलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तसेच सक्तीची वसुली थांबविण्याची मागणी केली. गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्यांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई यामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे, असा आरोप ऐरोली पदाधिकारी अरुण पडते, राणे व अ‍ॅड. बापू पोळ यांनी केला.कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीजपुरवठा बंद ठेऊन जनतेला वेठीस धरले जात आहे. सामान्य ग्राहकाने एक बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो, पण सरकारी विभागांकडे महावितरणची कोट्यवधींची थकबाकी आहे. राज्य सरकारने थकबाकी महावितरणकडे भरावी, तसेच सुरक्षा अनामत रक्कम आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी भाजप ऐरोली मंडलच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनास भाजपा मंडल पदाधिकारी चारुदत्त ठानांबीर, प्रदिप राणे, शिवाजी खोपडे, प्रकाश मंत्री, कैलास सुकाळे, नितीन देसाई, अनिल नाकटे, शेळके, राकेश लुष्टे, निकेतन पाटील, वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या निविदीता पोळ, शाम कोटकर, सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply