Breaking News

कोकण विभागात हिवताप निर्मूलनाचे कार्य उत्तम -डॉ. गौरी राठोड

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

कोकण विभागात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हिवताप विभागाने उत्तम कार्य करून हिवताप आटोक्यात आणला. कोरोना काळातही क्षेत्रीय स्तरावर उत्तम काम केले, असे गौरवोद्गार मुंबई मंडळ ठाणे आरोग्य विभागाच्या उप संचालक डॉ. गौरी राठोड यांनी काढले. जागतिक मलेरिया दिनाचे (25 एप्रिल) औचित्य साधून कोविड काळात विशेष कामगिरी करणार्‍या एमपीडब्ल्यू आणि एलएचव्ही या कोविड योध्यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करुन आरोग्य विभागामार्फत वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात पालघर, ठाणे आणि रायगड विभागातील एमपीडब्ल्यू आणि एलएचव्ही या कोविड योद्ध्यांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास हार्ट टू हार्ट फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी हार्ट टू हार्ट फाउंडेशनचे विश्वस्त रविकुमार व डॉ. जयकर यांनी कोकण विभागाच्या मलेरिया विभागाला मायक्रोस्कोप आणि स्लाईड्स भेट दिल्या. कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.आरोग्य विभागाच्या या राज्यस्तरीय सोहळ्याच्यावेळी सहसंचालक डॉ. स्वप्निल काळे, सहसंचालक कृष्ठरोग डॉ. मिलिंद रेगे, कोकण विभाग आरोग्य सेवेचे सहायक संचालक डॉ. बी. एस. सोनावणे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, पनवेल उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकपाळ, डॉ. आरती धुमाळ, व्यावसायिक श्री. व सौ. जयस्वाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. भोसले, डॉ. नागरे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply