Breaking News

खोपोली यशवंत नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचे ना. रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण

खोपोली : प्रतिनिधी

शहरातील यशवंत नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचे लोकार्पण गुरूवारी (दि.28)केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्याची संधी मिळाल्याचे मत ना. आठवले यांनी या वेळी व्यक्त केले. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंत नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र उभारणीसाठी रायगड जिल्हा नियोजन मंडळाने 53 लाख रुपये मंजूर केले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 25 डिसेंबर रोजी या संस्कार केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले होते. या इमारतीचे लोकार्पण  गुरूवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, सुमन औसरमल, मुख्याधिकारी अनुप दुरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, युवाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेश पाटील, माजी नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, धर्मानंद गायकवाड, प्रमोद महाडिक, आरपीआयचे शहर अध्यक्ष चिंतामणी सोनावणे, प्रवीण महाडिक, बाबू पुजारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि यशवंत नगरमधील नागरिक  या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंत नगर येथे  संस्कार केंद्र उभारावे यासाठी आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, युवा नेेते प्रमोद महाडिक यांनी पाठपुरावा केला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply