पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकर्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा 34वा पुण्यतिथी कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे.
जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजात रूजवली. त्यांच्या नावाने व आशीर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने शनिवारी होणार्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थ9+ानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य नगरसेवक अनिल भगत, प्रकाश भगत, हरिश्चंद्र पाटील, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, वसंत पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …