Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रात आजपासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड 19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. प्रशासनाकडून लसींचा पुरवठा न झाल्याने काही दिवस लसीकरण कार्यक्रम बंद करण्यात आला होता, मात्र 5000 कोविशिल्ड लसींची उपलब्धता झाली असल्याने सोमवार  (दि.12) पासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 21 लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये नऊ शासकीय आणि 12 खाजगी लसीकरण केंद्रे चालू आहेत. यामधील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता 20 लसीकरण  केंद्रावर पुर्वीप्रमाणे लसीकरण कार्यक्रम सुरू असणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत एकुण 632 लसीकरण सत्रे झाली आहेत. यामध्ये एकुण 63 हजार 879 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply