Breaking News

अलिबागमध्ये उद्या बिझनेस फोरम

प्रदीप ताम्हाणे करणार व्यावसायिकांना मार्गदर्शन

अलिबाग : प्रतिनिधी

लायन्स क्लब अलिबागतर्फे रविवारी (दि. 8) सकाळी 10 वाजता आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बिझनेस फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विख्यात उद्योजक प्रदीप ताम्हाणे अलिबागमधील व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर व्यवसाय टिकविणे आणि वृद्धिंगत करण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अलिबागमधील व्यावसायिक सक्षम व्हावेत, यादृष्टीने लायन्स क्लब अलिबाग तर्फे व्यावसायिकांना मार्गदर्शनपर बिझनेस फोरम सुरु करण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी यशस्वी उद्योजकांचे व्याख्यान आणि अनुभवकथन असे या फोरमचे स्वरुप आहे.  या फोरमचे द्वितीय पुष्प गुंफताना विख्यात उद्योजक प्रदीप ताम्हाणे  रविवारी सकाळी अलिबागमधील व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत. प्रदीप ताम्हाणे एका कंपनीत संशोधन आणि विकास विभागात ‘कलर इनचार्ज’ म्हणून आणि त्यानंतर औषधी गोळ्यांवरील रंगीत आवरण तयार करणार्‍या एका अमेरिकन कंपनीच्या लंडन शाखेत काही काळ नोकरी केली. मात्र औषधी गोळ्यांवरील रंगीत आवरण देण्याचे महागडे  तंत्रज्ञान मातृभूमीला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वत:ची विनकोट्स कलर्स ऍण्ड कोटींग प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी उभारली. ताम्हाणे यांची कंपनी आज पावडर कोटींगमधील जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या कंपनी बनविली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने  उद्योगश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस फोरममध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन लायन्स क्लब अलिबाग तर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी  भगवान मालपाणी 9881051000, महेश चव्हण 8390909461,  अभिजित पाटील 9325520057, रोहन पाटील 9820350728 यांच्याशी संपर्क साधावा.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply