Breaking News

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत अग्नितांडव

आठ कंपन्यांना आग; चार कामगार जखमी

नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (दि. 6) आठ कंपन्यांना भीषण आग लागून चार कामगार जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरुवातीला एका कंपनीला आग लागून ती पसरली. या आगीत इतर सात कंपन्यांचेही नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त समजताच ठाणे, पावणे, महापे कोपरखैराणे वाशी, ऐरोली या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होत्या. आठपैकी एका कंपनीत असलेल्या रबरामुळे आग विझली तरी पुन्हा भडकत होती.

Check Also

उलवे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नगरसेवक परेश ठाकूर यांची उपस्थिती उलवे नोड ः रामप्रहर वृत्तशारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा …

Leave a Reply