Breaking News

पनवेल रेल्वे स्टेशन ते भुयारी मार्गावरील खड्डे भरा

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची सिडकोकडे मागणी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल रेल्वे स्टेशन ते भुयारी मार्ग (पोदी स्मशान भूमी) पर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्रचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

पनवेल स्टेशन साई मंदिराकडून बाहेर पडून भुयारी  मार्ग (पोदी स्मशान भूमी)कडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांचे विशेषत: दुचाकी धारकांचे खूप हाल होत आहे. हा रस्ता सिडकोच्या अखत्यारित येत असूनही रेल्वे स्टेशनच्या गेटवर पडलेले खड्डे नगरसेविका दर्शना भोईर यांनी सांगितल्यावर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी टीआयपीएलच्या माध्यमातून भरून घेतले, पण या रस्त्याचे खड्डे तसेच राहिले आहेत. नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता यांना मंगळवारी पत्र देऊन पावसाळ्यापूर्वी ते खड्डे भरून घेण्याची मागणी केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply