Breaking News

नागोठण्यातील रस्ता त्वरित दुरुस्त करा

 भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांची मागणी

नागोठणे : प्रतिनिधी

शहरातील विठोबाच्या विहिरीसमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना योग्य ती काळजी न घेतल्याने तेथे तीव्र स्वरूपाचा उतार तयार झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे केली आहे.

पेव्हर ब्लॉक व्यवस्थीत न बसविल्याने नागोठण्यातील विठोबाच्या विहरीसमोरील रस्ता नादुरुस्त झाला असून, तेथून जाता-येताना ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना त्रास सहन करावा लागतो. त्याची तक्रार काही ग्रामस्थांनी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्याकडे केली होती. त्यानुसार सचिन मोदी यांनी नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद धात्रक यांची भेट घेऊन त्यांना सदर रस्ता त्वरीत दुरुस्त करण्याची विनंती केली. सदर रस्ता अनेकवेळा दुरुस्त केला आहे पण तो टिकत नाही, असे सांगून पावसाळ्यापुर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन सरपंच धात्रक यांनी दिले. ग्रामपंचायतीने नुकताच नुक्कड गल्लीतील कमानीचे नूतनीकरण केले. मात्र या कमानीखाली मोठा खड्डा तयार झाला आहे व त्याचा नागरिकांना त्रास होत आहे, ही बाबही मोदी यांनी सरपंच धात्रक यांच्या  निदर्शनास आणून दिली.

विठोबाच्या विहिरी जवळच्या रस्त्याचे काम    नागोठणे ग्रामपंचायतीने दिलेल्या आश्वासनानुसार वेळेवर केले पाहिजे. जर पंचायतीने या रस्त्याची दुरुस्ती वेळेत केली नाही तर लोकवर्गणीतून किंवा स्वखर्चाने सदरचा रस्ता दुरुस्त करून देऊ, असे भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply