नवी मुंबई ः बातमीदार
चौथी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा नुकतीच केरळची राजधानी तिरूअनंतपुरम येथे झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी उत्तम माने (वय 67) यांनी अॅथलेटिक्स आणि रायफल शूटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक असलेले उत्तम माने हे विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे. माने हे सानपाडा जेष्ठ नागरिक संघांचे सभासद आहेत. त्यांनी आतापर्यंत अॅथलेटिक्समध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पदके जिंकली आहेत.