Breaking News

नवीन पनवेलमध्ये होणार विकासकामांचे लोकार्पण आणि साहित्य वाटप कार्यक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम 1 जून रोजी रात्री 8.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेविका सुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून बांठिया हायस्कूल, दत्त मंदिर व कालिका माता मंदिर सेक्टर 13 आणि 14 येथे उभारण्यात आलेल्या तीन हायमास्टचे लोकार्पण, सीकेटी विद्यालयजवळील मँगो गार्डनमध्ये तसेच सेक्टर 13 मधील शिव मंदिर जवळील टेकडी गार्डन येथे ओपन जिमचे लोकार्पण, त्याचबरोबर डस्टबीन आणि प्रभाग 17मध्ये बेंचचे वाटप करण्यात येणार आहे. नगरसेविका सुशीला घरत यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयात होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, संतोष शेट्टी, मनोज भुजबळ, नगरसेविका चारूशिला घरत, राजेश्री वावेकर, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, के. डी. म्हात्रे, रवींद्र भगत आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नगरसेविका सुशीला घरत, डॉ. अस्मिता घरत यांनी दिली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply