खोपोली ़: प्रतिनिधी
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचार्यांचा नुकताच खोपोलीतील ब्राम्हण सभागृहात सन्मान करण्यात आला. पोलिसांकडे सकारत्मक भावनेतून पाहिल्यास त्याच्या वेदनांची जाणीव होईल, असे मत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय भावसार यांनी व्यक्त केले. खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. या वेळी शिरीष पवार व खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघड केलेल्या महिला पोलीस व पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला जनतेची सेवा करणे हे आमचे कर्तव्यच आहे. जनतेनेही सहकार्याची भूमिका ठेवल्यास सेवा करताना अधिक सोपं जाईल तसेच चोर्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशी सूचना या वेळी पोलीस निरीक्षक पवार यांनी केली. संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा किरण देशपांडे, राज्य महिलाध्यक्षा तनुजा गुळवी, ठाणे जिल्हा अध्यक्षा मेघा मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर घारे, उपाध्यक्ष निलेश विचारे, सचिव सुनिल ठाकूर, सहसचिव नितेश कदम, कोषाध्यक्ष प्रशांत गोपाळे, नगरसेवक राजू गायकवाड, नगरसेविका निकिता पवार, महिला जिल्हाध्यक्षा कविता खोपकर, स्मिता दुसाने, संतोष ठाकूर, गौरी ठाकूर, शारदा कसबे, वर्षा मोरे, आरती कुंभार, सुनेत्रा भिसे, अक्षरा चौधरी, रजनी म्हामुणकर, सुलक्षणा दाभाडे, साधना पाटील, भरत पाटील, हिरोजी देशमुख, रमाकांत म्हामूणकर, राजू रणवीर, संजय देशमुख, संजय म्हामूणकर, सोपान कालेकर, संतोष सांवत, समिश पाटील, विश्वनाथ म्हशीळकर, अॅड. तेजश्री करंजकर, भारती सणस, मानसी पवार, भारती पाटील, मंजुळा गोरे, किशोरी चेउलकर, हेमलता कर्णुक, शीतल गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper