Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज न्हावाखाडी येथे विविध उपक्रम

ज्येष्ठ नागरिक सत्कार, अभीष्टचिंतन सोहळा, मी मराठी संस्कृती दर्शन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 2) उत्तर रायगड जिल्हा भाजप व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील न्हावाखाडी येथे ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, अभीष्टचिंतन सोहळा, रुग्णवाहिका लोकार्पण, संस्कृतीचे दर्शन असलेला मी मराठी कार्यक्रम होणार असून या समारंभाची जय्यत तयारी बुधवारी अंतिम टप्प्यात आल्याचे पहावयास मिळाले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सुपरिचित आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. गरीब, गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. गेल्या चार दशकांत त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. म्हणूनच त्यांच्यावर सर्व क्षेत्रांतील लोकांचे प्रेम आहे व ते वृद्धिंगत होत आहे. या अनुषंगाने गुरुवारी न्हावाखाडी येथील म्हसेश्वर मंदिराशेजारील क्रिकेट मैदानावर सायंकाळी 6 वा. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. तत्पूर्वी 5.30 वा. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उलवे नोडकरिता देण्यात येणार्‍या रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण होईल, तर 7 वा. लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत व नंदेश उमप निर्मित लोककलांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यासाठी येणार्‍या शुभेच्छुक हितचिंतकांनी पनवेल येथील निवासस्थानी किंवा कार्यालयात न येता 2 जून रोजी न्हावाखाडी येथे होणार्‍या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply