Breaking News

उलवे सायक्लोथॉन स्पर्धेत तब्बल 934 सायकलपटूंचा सहभाग

पुण्याचा प्रणव कांबळे आणि कोल्हापूरची रंजिता घोरपडे विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 5) उलवे नोडमध्ये झालेल्या भव्य उलवे सायक्लोथॉन 2022 स्पर्धेत राज्यातील तब्बल 934 सायकलपटू स्पर्धकांनी सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेतील 25 किमीच्या गटात पुरुषांमध्ये पुण्याचा प्रणव कांबळे, तर महिलांमध्ये कोल्हापूरच्या रंजिता घोरपडे यांनी बाजी मारली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेस प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वाती पानसरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक इंगोले, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर सीताताई पाटील, पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, अजय भगत, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, जयवंत देशमुख, रवींद्र भगत, अनंता ठाकूर, भार्गव ठाकूर, सुहास भगत, सुधीर ठाकूर, विश्वनाथ कोळी, अंकुश ठाकूर, अवधेश महतो, सुहास भगत, मनोज मौर्य, शैलेश भगत, किशोर पाटील, कैलास कोळी, मोेरेश्वर मोकल, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील, शुभांगी पाटील, जयश्री घरत, मोरेश्वर पाटील, राजीव रंजन, अर्चना मिश्रा, सागर रंधवे, मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी, श्यामनाथ पुंडे, उलवे सेना सामाजिक संस्थेचे अक्षय काशीद, पल्लवी सुर्वे, सचिन आवटे, गुड्डू कनोजिया, मनोज सिंह, अमित झा, अनिल सनस, वांची एस, विकी भिडे, किरण लोहकरे, फरहान चॅटर्जी, डॉ. रवी दिघे, नित्यानंद पांडे, गोकुळ पुरी, रोषणी डिमेलो, सुवर्णा सनस, ज्योत्स्ना ठाकूर, सरोज मानवटकर, ओमकार कदम यांच्यासह पदाधिकारी, सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सायकलिंग आयकॉन म्हणून 71 वर्षीय राज शर्मा, 68 वर्षीय रमाकांत महाडिक, 12 वर्षीय सई पाटील, तर जगभर सायकल भ्रमंती करणार्‍या शितल बांबूलकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित ही स्पर्धा महिला व पुरुष प्रकारात आणि 25, 15, 10 व तीन किमी अंतर अशा चार गटांत झाली. विशेष आकर्षण असलेल्या 25 किमी अंतराच्या पुरुष गटात प्रणव कांबळे याने प्रथम क्रमांक (20 हजार रुपये बक्षीस), द्वितीय कोल्हापूरचा प्रतीक पाटील (10 हजार रुपये), तृतीय मुंबईचा सिद्धार्थ लवंडे (पाच हजार रुपये), चतुर्थ रायगडचा निकेत पाटील (तीन हजार रुपये) व पाचवा क्रमांक सांगलीचा अमन तांबोळी (दोन हजार रुपये) याने पटकाविला. अनुप पवार, गिरीष पवार, अजित हिरकणी, हर्षल आहेर, पार्थ पेडणेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
25 किमी अंतराच्या महिला गटात प्रणव रंजिता घोरपडे हिने प्रथम क्रमांक (20 हजार रुपये बक्षीस), द्वितीय नाशिकची संस्कृती जाधव (10 हजार रुपये), तृतीय पुण्याची आदिती शिंदे (पाच हजार रुपये), चतुर्थ स्नेहल माळी (तीन हजार रुपये) व पाचवा क्रमांक घाटकोपरच्या विधी भानुशाली (दोन हजार रुपये) हिने पटकाविला. चैताली शिलधनकर, दिपाली भालेराव, अवणी नातू, सादिका शेख, जयश्री प्रसाद यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या प्रत्येक स्पर्धकास टी-शर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवक व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच या ठिकाणी झुम्बा मनोरंजनाचा लाभ प्रेक्षक व स्पर्धकांनी घेत मनमुराद आनंद लुटला. त्याचबरोबर तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली फॅन्सी ड्रेस स्पर्धाही विशेष आकर्षण ठरली. यात काव्या वाघ या चिमुकलीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.
या स्पर्धेच्या अनुषंगाने सोसायट्यांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील ग्रीन सोसायटी स्पर्धेत प्रथम क्रमांक शंकेश्वर प्लाझो, द्वितीय भगवती इम्पोरिया, तृतीय क्रमांक प्रोग्रेसिव्ह आयकॉन; सर्वांत जास्त सोसायटी सहभाग स्पर्धेत प्रथम क्रमांक युफोरिया सिएचएस, द्वितीय ईशवर ऑरा, तृतीय क्रमांक पार्श्व हाईट आणि क्लीन सोसायटी स्पर्धेत प्रथम क्रमांक व्हाईट विंग्स, द्वितीय मोरेश्वर हेरिटेज व तृतीय क्रमांक प्रोग्रेसिव्ह ईव्ही या सोसायटीने पटकाविला. या तीनही स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे 10 हजार, तीन हजार व दोन हजार रुपये असे पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

करंजाडे, उलवे नोड पनवेल महापालिकेत समाविष्ट करावे -लोकनेते रामशेठ ठाकूर
विविध प्रांतातील लोक उलवे नोडमध्ये वास्तव्यास आले आहेत. त्यांनी स्थानिकांसोबत एकरूप व्हावे, असे सांगून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर या वेळी म्हणाले की, या विभागाचा लोकसंख्येच्या अनुषंगाने विस्तार वाढला आहे. त्यामुळे करंजाडे व उलवे नोड पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट करावे, अशी आमची मागणी आहे. सायक्लोथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उलवे सेना सामाजिक संस्था, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबरीने स्वयंसेवकांची मेहनत महत्त्वपूर्ण ठरली, असेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन चांगला पर्याय आहे. उत्तम आयोजनातून झालेली ही स्पर्धा कौतुकास पात्र आहे. झाडे लावा, पाणी वाचवासोबतच जंक फूडचा वापर टाळा, हिरव्या भाजी खा हा संदेश सर्वत्र पसरला पाहिजे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी पर्यावरणाचे महत्त्व टिकवले पाहिजे.
-स्वाती पानसरे, अभिनेत्री

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply