Breaking News

शिरवणेत दूषित पाणीपुरवठा

नागरिक संतप्त; माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी अधिकार्‍यांना विचारला जाब

नवी मुंबई ः प्रतिनिधी

शिरवणे गाव व सेक्टर 1 परिसरातील रहिवाशांना मागील दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता, तसेच येणारे पाणी दूषित व गढूळ असल्याने नागरिक संतप्त झाले. याबाबत भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपाच्या पाणी पुरवठा अधिकार्‍यांना बोलावून जाब विचारला.

शिरवणे गाव आणि सेक्टर 1 मधील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे पुरेसे पाणी मिळत नव्हते .येणारे पाणीही दूषित स्वरूपात असल्याने नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्या ना सामोरे जावे लागत होते. स्थानिक नागरिकांच्या पाणी विषयी वाढत्या समस्या व तक्रारी लक्षात घेत मंगळवारी (दि. 7) माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपाच्या अधिकार्‍यांना पाहणी दौर्‍यास पाचारण केले होते. या वेळी माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासमवेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष घुमास्ते, उपअभियंता संदेश भानुशाली, लगदिवे यांच्यासमवेत चर्चा करून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना केल्या.

शिरवणे आणि नेरुळमधील पिण्याच्या पाण्याची तक्रार लवकरच दूर होईल असे सदर अधिकार्‍यांनी या वेळी आश्वासित   केले, तसेच नवी मुंबई मनपाकडून यापुढे अशा सूचना दिल्या जातील, असे सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply