खारघरमध्ये रविवारी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त अटल फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ खारघर एक्सिक्युटिव्ह रूधिरसेतु यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व गरीब, गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 19 रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 12) होणार्‍या या शिबिरामध्ये डोळे तपासणी, ब्लड शुगर, बी.पी., मोफत आजार तपासणी, ई.सी.जी. दातांचे आजार तपासणी, बी.एम.डी. कॅलशियम अशा तपासण्या होणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनाद्वारे उपचार होणार आहेत. रक्तदान शिबिरासाठी टाटा ब्लड बँकचे सहकार्य लाभेल. यासोबतच डॉ. उत्तम कुमार शिंदे (श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सेक्टर 21), डॉ. सुस्मीत यादव (सुस्मीत डेन्टल क्लिनिक द पॅसिफीक, शिल्प चौक, खारघर), डॉ. बिरूदेव गोराड (इंपॅक्ट डायग्नोस्टिक), डॉ. वैभव ठक्कर (एम.जी.एम. हॉस्पिटल अ‍ॅन्ड डेंटल कॉलेज), डॉ. रूपाली कपाले (नेत्ररोग तज्ञ), डॉ. केशव काळे (हृदयरोग तज्ञ) हे डॉक्टर व संस्था सहभागी होणार आहेत. अशी माहिती देत या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अटल फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply