मुंबई : सरसकट सर्व महिलांना बुधवार (दि. 21)पासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7नंतर मुंबई लोकल सुरू असेपर्यंत सर्व महिलांना ट्रेनमधून प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबईत महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता आणि या संदर्भात रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून परवानगी देण्याची विनंती केली होती, मात्र असे लगेचच करता येणार नसल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले होते तसेच गर्दी होऊ नये यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबणार याची माहिती मागितली होती. शासनाने मंगळवारी पुन्हा पत्र पाठवत महिलांसाठी गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली. त्याला रेल्वेमंत्री गोयल यांनी प्रतिसाद दिला आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper