Breaking News

अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहात अग्नितांडव

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबामधील पीएनपी नाट्यगृहाला बुधवारी (दि. 15) दुपारी भीषण आग लागली. या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या बंबांनी शर्तीचे प्रयत्न करून दोन तासांत ही आग आटोक्यात आणली.
या नाट्यगृहाचे लोकार्पण 7 जुलै 2017 रोजी करण्यात आले होते. गेली पाच वर्षे या नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, स्पर्धा, नाटक, मनोरंजनाचे इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. बुधवारच्या या भीषण दुर्घटनेत हे कार्यक्रम केवळ आठवणी बनून राहिल्या आहेत.
बुधवारी दुपारी अचानक नाट्यगृहातून आगीचे, धुराचे लोट बाहेर आले आणि एकच खळबळ उडाली. सर्वांनी नाट्यगृहाकडे धाव घेतली. आगीची तीव्रता इतकी भयंकर होती की, नाट्यगृहाचे छत, भिंती तुटून पडल्या. आसनव्यवस्था आणि तांत्रिक व्यवस्थादेखील जळून खाक झाली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply