Breaking News

गावी परतलेल्या युवकांची शेतीकामात साथ

कुटुंबासह ग्रामस्थांना होतेय मदत

माणगाव : प्रतिनिधी
कोरोना साथीत लॉकडाऊनमुळे कारखाने, कार्यालये बंद झाल्याने शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेली युवा मंडळी आपापल्या गावी परतली आहेत. हे तरुण शेतीच्या कामासाठी आधार ठरत आहेत. त्यामुळे कुटुंब तसेच ग्रामस्थांना हातभार लागत आहे.
लॉकडाऊनमुळे शहरांत असणारे चाकरमानी आपल्या मूळ गावी परतले आहेत. यात तरुणांची संख्या मोठी आहे. हे युवक सध्या कुटुंबीयांसह गावकर्‍यांना शेतीच्या कामात मदत करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मळ्यातून भाजी काढणे, भाजीपाला पॅक करणे तसेच शेतीसाठी अन्य मदत युवावर्ग करीत आहे.
कोरोना साथीचा वाढणारा प्रादुर्भाव आणि त्यामुळे नोकरी-व्यवसायावर होणारा परिणाम पाहता भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील व तरुण शेतीकडे वळतील, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply