मुंबई : बातमीदार
पावसाळा आला की सर्व शासकीय यंत्रणांना दुप्पट गतीने कामे करावी लागतात. सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या अखत्यारीतील विविध घटकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. महावितरणची यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे, महावितरणच्या कर्मचारी व अधिकार्यांना सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी देखभाल व दुरुस्तीची कामे आहेत. जर पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे केली तर आपण चांगली व अखंडित वीज ग्राहकांना देऊ शकतो. तसेच संभाव्य विद्युत धोका ही आपण टाळू शकतो. महावितरण भांडूप परिमंडलाचे, मुख्य अभियंता धनंजय औढेंकर यांनी सर्व विभागातील कार्यकारी अभियंत्यांना पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता नेरुळ, यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांना सुरुवात केली असून ही काम पूर्णत्वावर आली आहेत. वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता पाठपुरावा करत असल्यामुळे कामाला अजून वेग आला आहे. नेरूळ विभागांतर्गत आतापर्यंत एकूण 256 फिडर पिलरच्या दुरुस्तीची कामे झाली आहेत. अग्रोळी व दिवाळे गावात फीडर पिलर दुरुस्तीचे तसेच जमिनीवरील केबल भूमिगत करण्यासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल, सहाय्यक अभियंता नेरूळ रोहित बागुल यांचे कौतुक तेथील ग्रामस्थांनी केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …