Breaking News

युईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल 99.46 टक्के

उरण : वार्ताहर

या वर्षी जाहीर झालेल्या 10वी च्या निकालात यु. ई .एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.46 टक्के निकाल लागला असून कनिष्का गिरीष पाटील हिने 94.80 टक्के मिळवून प्रथम क्रमांक, यश जितेंद्र म्हात्रे, गायत्री रविंद्र घोलप आणि शिवांगी नानासाहेब डांगे या तिघांनीही 93 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. संस्कृती नरेंद्र ठाकूर हिने 91.40 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच स्नेहद कुंदन पानसरे व सिंपल श्रीकांत डोगरा या दोघांनीही 91 टक्के मिळवून चौथा क्रमांक व वेदांत विजय रावते याने 90.80 टक्के मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे. यु.ई.एस.च्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.या यशात विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आईवडिल, शिक्षक तसेच यु .ई. एस.स्कूल कमिटी मेंबर्स, स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, माध्यमिक विभागाच्या सुपरवायझर ह्या सर्वांचाही सहभाग आहे. यु.ई.एस. च्या कमिटी मेंबर्सकडून गुणवान व यशस्वी विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेणार्‍या सर्व शिक्षकांचे कौतुक केलं जात आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply