Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागाव ग्रामपंचायतीची औषध फवारणी

रेवदंडा : प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागाव (ता. अलिबाग) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे, तसेच मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत.

नागाव ग्रामपंचायत हद्दीमधील जीवनाश्यक वस्तू व सेवांची ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट ऑफिस, सर्व मेडिकल स्टोअर्स, एटीएम, शासकीय व खाजगी दवाखाने, किराणा माल, भाजी विक्री व रेशन दुकाने, पेट्रोल पंप निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणीचे काम सुरू आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरीसुध्दा सॅनिटायझर फवारणी सुरू करण्यात आली आहे.

मास्क न वापरणार्‍यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसुल करण्यात येत असून, त्यासाठी नागावमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व हटाळे बायपासजवळ मास्क चेकपॉईंट सुरू करण्यात आले आहेत.

प्रत्येकाने ग्रामपंचायत व शासन स्तरावरील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच कोरोना विषाणूंची साखळी तोडण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन नागाव ग्रामपंचायती तर्फे ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply