श्री चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील खुटारी येथे श्री शंकराचे देऊळ ट्रस्टच्या सौजन्याने श्री. संत वामनबाबा महाराज, श्री. संत सावळाराम बाबा महाराज, श्री. संत आप्पा माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री. चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिन व नाम चिंतन हरिनाम सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात झाले.
या सोहळ्यास पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, हरिचंद्र म्हात्रे, शिवसेनेचे एकनाथ म्हात्रे, कुशिंद्र म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, मुरलीधर म्हात्रे, रतन म्हात्रे, गोविंद गायकर, केशव रुपेकर, विलास म्हात्रे, किसन म्हात्रे, शांताराम म्हात्रे, शरद म्हात्रे, केशव म्हात्रे, धोंडुराम रुपेकर, गणेश म्हात्रे, गोमा म्हात्रे, वामन म्हात्रे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती लाभली.
श्री चैतन्येश्वर महादेव मंदिर येथे झालेल्या या सोहळ्यात अभिषेक, आरती, चैतन्येश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, श्री. पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ खारघरचे भजन, ह.भ. प. संजय महाराज मढवी यांचे प्रवचन, ह.भ. प. गणेश महाराज पुलकुंठ्वार यांचे किर्तन, ओम नर्मदेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, राधा कृष्ण प्रासादिक भजन मंडळाचे भजन, ह.भ. प. रघुनाथ महाराज पाटील यांचे प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, ह.भ. प. महेश महाराज साळुंखे यांचे किर्तन, महाप्रसाद, अशी विविध भक्तिमय कार्यक्रमे पार पडली. त्यानंतर ह.भ. प. विक्रांत महाराज पोंडेकर (आळंदी देवाची) यांचे काल्याचे किर्तन होऊन या सोहळ्याचा समारोप झाला. या कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविक भक्त, रायगड, ठाणे परिसर, श्री सदगुरु वामनबाबा पायी दिंडी सोहळा रायगड ठाणे परिसर यांची किर्तनसाथ मिळाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक म्हणून श्री. चैतन्येश्वर ग्रामस्थ मंडळ, एकटपाडा श्री गावदेवी क्रिकेट संघ यांनी विशेष मेहनत घेतली.