पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
महापौर सहाय्यता निधीतून पनवेलमध्ये तीन लाभार्थ्यांना सोमवारी (दि. 27) महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते मदतीचे धनादेशांचे वाटप करण्यात आले. महापौर कार्यालयाजवळील सभागृहात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजूरी देऊन, प्रभावती जाधव यांना फॅक्चर ऑफ फ्यमुर शस्त्रक्रियेसाठी दहा हजार रूपये, क्रियांश पाटील यांना शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रूपये, अनिकेत चव्हाण यांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी 15 हजारांची मदत महापौर सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, संजना कदम, नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका सुशीला घरत यांच्यासह महापौर
सहाय्यता निधी समितीच्या सर्व सदस्या, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, नगरसचिव तिलकराज खापर्डे तसेच पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.