Tuesday , February 7 2023

यंग ब्रिगेडला मिळाली संधी, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

न्यूझीलंड दौर्‍यातील टी-20 मालिकेसाठी दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे, तर वन डे संघात पृथ्वी शॉ याला स्थान मिळाले आहे.

भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर पाच टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा 2020मधील हा पहिला परदेश दौरा आहे. त्यासाठी टी-20 संघ जाहीर करण्यात आला होता. या दौर्‍यातून शिखर धवनला दुखापतग्रस्त झाल्याने दौर्‍यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी टी-20 संघात खेळण्यासाठी संजू सॅमसनला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हिरवा कंदील दाखवला आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी जाहीर केलेल्या वन डे संघात पृथ्वी शॉला वन डे संघात संधी देण्यात आली आहे. या दोघांची अंतिम संघात निवड झाल्यास त्यांच्यासाठी ते संबंधित प्रकारातील आंतरराष्ट्रीय पदार्पण असेल.

गतवर्षी भारताने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय मालिकेत 4-1 असे पराभूत केले, तर ट्वेन्टी-20 मालिकेत मात्र यजमानांनी भारताला 2-1 असे नमवले होते.

टी-20 संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर. वन डे संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, केदार जाधव.

Check Also

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास पूर्णत्वाची प्रतीक्षा

स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम …

Leave a Reply