Breaking News

उरणमध्ये ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह उत्साहात

उरण ः वार्ताहर

उरण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तालुक्यातील बेलोंडेखार येथे मंगळवारी (दि. 28) या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, भातलावणी तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, महाडीबीटी यांत्रिकीकरण, पीएमएफएमएफ योजना व व इतर योजनेचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच आत्मांतर्गत महिलांना परसबाग भाजीपाला, बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सहाय्यक विभावरी चव्हाण, बीटीएम कविता ठाकूर, उपसरपंच सोनाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला गटाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष, महिला शेतकरी उपस्थित होत्या.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply