Breaking News

रसायनीत दाखले वाटप शिबिर

मोहोपाडा : प्रतिनिधी

महाराजस्व अभियान 2022-23 अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकार यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार श्रीयुत तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक कामासाठी व अन्य कामांकरिता लागणार्‍या विविध स्वरूपात दाखले प्रमाणपत्रे वाटप शिबिर मोहोपाडा येथील शिशू विकास बालमंदिर येथे झाले. या शिबिरात उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखला आदी दाखले घेण्यासाठी रसायनी परिसरातील नागरिकांनी सकाळी 9 वाजल्यापासून मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून येत होती. सुमारे 185 नागरिकांनी दाखले वाटप शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांना तत्काळ डोमिसाईल दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखला आदी दाखले मिळाल्यामुळे नागरिकांनी शासनाचे आभार मानले. या वेळी नायब तहसीलदार विजय पुजारी, मंडळ अधिकारी किरण पाटील, तळाटी शीतल मंदाडे, चौक तलाठी मुदगल, रिस तलाठी अमोल बोराटे, तूपगाव वावर्ले तलाठी मधुसूदन पापटवार, लोहोप तळाटी अभिजित हिवरकर, शिशू विकास मंडळाच्या अध्यक्षा सरोजिनी साजवान, कुलकर्णी मॅडम, अरूण गायकवाड, सुनिता कराड, मुख्याध्यापक महादेव पाटील, सुप्रिया गायकर, कोतवाल रवींद्र गायकवाड व शिशुविकास बाळमंदिराचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply