Breaking News

डिलेव्हरी बॉयकडूनच कंपनीमध्ये चोरी

सात लाख 62 हजारांचा घातला गंडा

पनवेल ः वार्ताहर

ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणार्‍या डिलिव्हरी बॉयनेच 22 महागड्या मोबाईलची चोरी करून कंपनीला तब्बल सात लाख 62 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कलिमखान बाबुखान पठाण (34) असे डिलिव्हरीबॉयचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तसेच त्याच्या घरातून पाच मोबाइल हस्तगत केले आहेत.

कलिमखान पठाण हा सीबीडी बेलापूर येथील शहाबाज गावात राहण्यास असून तो खारघरमधील एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत डिलिव्हरीबॉयचे काम करीत होता. कंपनीच्या कार्यालयातून डिलिव्हरीसाठी नेलेल्या वस्तू तसेच परत आणून जमा केलेल्या वस्तू व जमा केलेले पैशांची नोंद खारघरमधील शाखेमध्ये केली जाते. गत सप्टेंबरमध्ये कंपनीच्या वतीने व्यवहाराची तपासणी करण्यात आली असता, खारघर शाखेमधील मोबाईल फोनची संख्या व हिशेबाचा मेळ बसत नसल्याचे कंपनीतील अधिकार्‍यांच्या लक्षात आले.

त्यामुळे विभागाची माहिती काढली असता, डिलिव्हरी बॉय कलिमखान पठाण याच्यावर संशय आला. कंपनीने त्याच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवली. कलिमखान हाच कंपनीतील मोबाईलची चोरी करीत असल्याचे लक्षात आले.

बुधवारी तो खारघर येथील कंपनीच्या कार्यालयात आला असताना त्याच्याकडे विचारपूस केली, मात्र सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्याला कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता, त्याने दोन मोबाईलची चोरी केल्याचे कबूल केले, तसेच दोन मोबाईल घरी ठेवल्याचे सांगितले, मात्र त्याच्या घरात पाच मोबाईल सापडले.

त्यानंतर कंपनीने आपल्या सिस्टीमची तपासणी केली असता गत पाच महिन्यात एकूण 22 मोबाईलची चोरी झाल्याचे आढळून आले. कलिमखानने मोबाईलची चोरी करून ग्राहकांना विकल्याचे कबूल केले.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply