पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या उलवे, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर येथील शाळेमध्ये वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या वेळी उलव्याचे माजी सरपंच एम. डी. खारकर, उपसरपंच जगदीश खारकर, तरघर स्कूल कमिटी अध्यक्ष शंकर मोहीते, गणेशपुरी ग्रामपंचायत सदस्य रामनाथ कोळी, उलवे स्कूल कमिटी अध्यक्ष शितल महेश सोमासे, मोहो येथील मच्छींद्र कोळी, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, युवा अध्यक्ष निलेश खारकर, मोरावे ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, ज्येष्ठ नेते गणेश सोमासे, युवा नेते प्रणय कोळी, स्वप्नील म्हात्रे, प्रदीप डोलनुर, बामणडोंगरी गाव अध्यक्ष नंदु ठाकूर, उलवे नोड उपायक्ष शैलेश भगत, उलवे गाव अध्यक्ष दीलीप कोळी, युवा मोर्चा सरचिटणीस धिरज ओवलेकर, भरत म्हात्रे, आदर्श शिक्षण गायकवाड गुरुजी आदी उपस्थित होते.