पेण : प्रतिनिधी
मध्य रेल्वेने पेण-दिवा मार्गावर मंगळवारी (दि. 5) पासून दोन नव्या मेमू गाड्या सुरू केल्या असून, त्याबद्दल पेणमधील प्रवाशांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पेणकरांना जास्तीत जास्त एक्स्प्रेस गाड्या आणि मेमू गाड्या मिळाव्यात, अशी मागणी मी पेणकर आम्ही पेणकर या संघटनेने केली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर रोज सकाळी पावणेसात वाजता आणि सायंकाळी सहा वाजता अशा दोन नव्या पेण-दिवा मेमू गाड्या सुरू केल्या आहेत. त्याबद्दल पेणमधील प्रवाशांनी मंगळवारी रेल्वे स्थानकात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच स्टेशन मास्तर एल. एन ठाकूर व चालक यांचे स्वागत केले. या वेळी मोहिनी गोरे, योगेश म्हात्रे, सी. आर. म्हात्रे, विजय पाटील, काशिनाथ पाटील आदींसह मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मेमू गाडीमधून जाणार्या प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.