Breaking News

महाड-पोलादूपरसाठी आवश्यक बचाव साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे

आमदार प्रवीण दरेकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन

मुंबई : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 8) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले तसेच आपत्तीच्या काळात त्या भागांमध्ये संरक्षक भिंती व निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याची विनंतीही दरेकर यांनी या वेळी केली. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीसाठी आवश्यक असलेले बचाव साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. भाजपचे नेते आमदार दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी महाड व पोलादपूर या भागांचा तातडीने दौरा केला. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व तेथे तातडीने मदतकार्य देण्याच्या दृष्टीने तेथील जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्या. महाड व पोलादपूर गावांमधील काही भागांमध्ये पूरप्रवण व दरडप्रवण परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या काळात या भागात वारंवार नैसर्गिक आपत्ती घडत असतात. विशेषतः मान्सून काळात रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे मान्सून काळात या जिल्ह्याला अनेक आपत्तीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. तथापि, पूरप्रवण, दरडप्रवण गावांमध्ये आपत्कालीन प्रसंगी अत्यंत महत्वाचे व आवश्यक शोध व बचाव साहित्य सहजपणे उपलब्ध असणे गरजेचे आहे. ते लक्षात घेता उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तीचा सामना करण्याच्या उद्देशाने आवश्यक शोध व बचाव साहित्याची देण्याची मागणी भाजपचे नेते दरेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महाड व पोलादूपर तालुक्याच्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आवश्यक साहित्याच्या मागणीपत्रकात एचडीपीई बोट, लाईफ जॅकेट्स, लॅटर, सॅटेलाईट फोन, हाय बीम सर्च लाईट, मल्टीपरपज फ्लोटिंगस्ट्रेचर, ड्रोन कॅमेरे,जनरेटर्स, वॉकीटॉकी, अंडर वॉटर कॅमेरा, फॉगिंग मशीन्स, बॅटरी ऑपरेटर फ्लड लाईटस आदी प्रमुख साहित्यांचा समावेश आहे तसेच आपत्तीच्या काळात त्या भागांमध्ये संरक्षक भिंती व निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याची विनंतीही आमदार दरेकर यांनी केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply