Breaking News

मुरुड तालुक्यात भातशेतीच्या लावणीला प्रारंभ

मुरूड : प्रतिनिधी

पावसाने मुरूड तालुक्यात दमदार हजेरी लावली असून, आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. जुलै महिन्यात झालेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मुरूड परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवार (दि. 11) पासून लावणीला सुरुवात केली आहे. मुरुडमध्ये आतापर्यंत सरासरी 1089  मिमी.पावसाची नोंद झाली आहे.

मुरूड तालुक्यातील 3900 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. तालुक्यात प्रामुख्याने सुर्वणा, रुपाली, कर्जत 2 व 5 ,8, जया या वाणाची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते. तालुक्यात सुरुवातीपासूनच भात शेतीला अनकूल पाऊस झाल्याने पेरणी केल्यानंतर अवघ्या पंचवीस दिवसातच भाताची रोपे योग्य प्रकारे वाढली आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

मात्र अगोदर पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकर्‍यांनी भातपिक लावणीला सुरुवात केली आहे.

लावणीसाठी काही ठिकाणी नांगर तर काही ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने नांगरणी करण्यात येत आहे. मजुरीने माणसे घेऊन भातपिकाची लावणी करण्याचा कल अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply