Breaking News

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साधला पत्रकारांशी संवाद

पेण : प्रतिनिधी

मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून संपर्क अभियान सुरु केला असून, रविवारी (दि. 10) त्यांचे पेणमध्ये फटाक्याच्या आतषबाजीत मनसे पदाधिकार्‍यांनी  स्वागत केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली होती. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अमित ठाकरे यांनी अभिवादन केले.

मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, गोवर्धन पोलसानी, पेण तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, संदीप ठाकूर, महेश पोरे, सुदेश संसारे, महिला शहराध्यक्षा निकिता पाटील, सपना देशमुख, शालोम पेणकर, प्रकाश मनोरे, ऋषी कोळी आदींसह मनसे व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पदाधिकार्‍यांच्या बैठकीपूर्वी अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझा हा कोकण दौरा असून राज्यात मनसेची विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. या संपर्क अभियानातून विद्यार्थी संघटना मजबूत करणे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 1 ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने विद्यार्थी संघटनेची कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी या वेळी दिली.

आतापर्यंत झालेल्या दौर्‍यात युवक-युवतींचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून मनसे विद्यार्थी संघटना पुन्हा एकदा जोमाने काम करेल, असा विश्वास अमित ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply